दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी बालाजी मंदिर संस्थानचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २१ हजारांचा धनादेश

Maharashtra Sarthi Team Picture
On

fd445916-fb44-44fd-a667-7003f192b2d5

शिंदखेडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शिंदखेडा येथील बालाजी मंदिर संस्थानने पुढाकार घेतला आहे. संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री दुष्काळ सहाय्यता निधीसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.शिंदखेडा येथे रथोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकार भिका पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अनावश्यक खर्च टाळून तो निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची सूचना केली होती. या सूचनेची दखल घेत बालाजी मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने २१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार विश्वस्त मंडळाच्या वतीने तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी विश्वस्त हिम्मतसिंह राऊळ, चेतन शिंपी, देविदास देसले, जीवन भामरे तसेच प्रा. प्रदीप दीक्षित आणि प्रा. चंद्रकांत डागा उपस्थित होते.दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंदिर संस्थानने घेतलेला हा निर्णय सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला असून, धार्मिक उत्सवांसोबतच सामाजिक दायित्वाची जाणीवही या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे.

खबरें और भी हैं

देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

ताजा बातम्या

देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

शिंगवे बहुला (प्रतिनिधी) : शिगवे बहुला गावातील  प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देवळाली जनकल्याणी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य, खाऊ व फळांचे वाटप...
नाशिक  
देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

बुलढाणा (प्रतिनिधी)  राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले असले, तरी शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात शेतकऱ्याला...
राज्य 
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

नवी दिल्‍ली प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने आज उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल मार्ग प्रकल्पातील 6.59 किलोमीटर लांबीच्या ‘बोगदा क्रमांक 14’चे...
राष्ट्रीय 
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

धुळे प्रतिनिधी - शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून कापूस विक्रीचे १० लाख ७५ हजार रुपये लुटून नेणाऱ्या टोळीचा शोध धुळे पोलिसांनी...
क्राईम 
धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..