- Hindi News
- नाशिक
- देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा
देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

शिंगवे बहुला (प्रतिनिधी) : शिगवे बहुला गावातील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देवळाली जनकल्याणी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य, खाऊ व फळांचे वाटप करून बाल दिन साजरा करण्यात आला.देवळाली जनकल्याणी फाउंडेशनतर्फे शिगवे बहुला येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा तुपलोंढे यांनी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने व दीपप्रज्वलन करण्यात आली. बालदिनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या वह्या, रंगकामाचे साहित्य, खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.
कार्यक्रमाला फाउंडेशनच्या अध्यक्षा नाझनीन तरवाला, सचिव होवी पूनावाला, उपाध्यक्षा सोनाली गायकवाड व दुर्रिया युसुफ, खजिनदार भाग्यश्री पवार तसेच ज्योती प्रधान, कविता गंगनानी, सीमा गुप्ता, काहेरा नवाज, अंजुम खान, ममता चंद्रन आणि मोनिका चंद्रन उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. फाउंडेशनच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण घालवून बालदिनाचा उत्सव संस्मरणीय केला.
