- Hindi News
- जळगाव
- पंकज विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
पंकज विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन; विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचे महत्त्व पटवून दिले

चोपडा (प्रतिनिधी) : येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, २६ नोव्हेंबर हा दिवस लोकशाहीची ताकद आणि नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी दिली आहे. संविधानातील मूल्यांचे जतन करून कर्तव्यनिष्ठेने देशाच्या प्रगतीत योगदान देणे, हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.प्रा. नंदलाल वाघ यांनी संविधान दिनाचे महत्त्व तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणाम याविषयी माहिती दिली. यानंतर उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैशाली चौधरी, अजय सैंदाणे, योगराज रायसिंग, जितेंद्र महाजन, दिवाकर बाविस्कर, सौरभ कुलकर्णी, संजय भादले, आशिका पाटील, विजय पाटील, वेलसिंग बारेला आणि गजानन पाटील यांनी परिश्रम घेतले.
