तडीपार असूनही गावात फिरणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Maharashtra Sarthi Team Picture
On

205e28e8-3f64-46d0-b7dd-35411ab4d219

देवळाली (प्रतिनिधी) : पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेला इसम तडीपार आदेशाचा भंग करून देवळाली कॅम्प हद्दीत फिरत असल्याचे गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाच्या निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी पाहिजे/फरार, तडीपार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्याअनुषंगाने दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार व तडीपार चेक करीत असताना, तडीपार इसम ऋषीकेश उर्फ डाकू दिनेश लोखंडे (वय २३, रा. रेणुकादेवी मंदिरामागे, रेस्ट कॅम्प रोड, देवळाली कॅम्प) हा भगूरगाव, नाशिक येथे देवी मंदिरासमोरील रस्त्यावर असल्याची बातमी मिळाली.पथकाने त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. याप्रकरणी पोअं/प्रविण वानखेडे यांनी फिर्याद दिल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत मोहिते, श्रेणी पोउनि मुक्तारखान पठाण, यशवंत बेंडकोळी, सपोउपनि गुलाब सोनार, पोअं प्रविण वानखेडे यांनी केली.

खबरें और भी हैं

देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

ताजा बातम्या

देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

शिंगवे बहुला (प्रतिनिधी) : शिगवे बहुला गावातील  प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देवळाली जनकल्याणी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य, खाऊ व फळांचे वाटप...
नाशिक  
देवळाली जनकल्याणी फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

बुलढाणा (प्रतिनिधी)  राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले असले, तरी शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात शेतकऱ्याला...
राज्य 
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

नवी दिल्‍ली प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने आज उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल मार्ग प्रकल्पातील 6.59 किलोमीटर लांबीच्या ‘बोगदा क्रमांक 14’चे...
राष्ट्रीय 
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

धुळे प्रतिनिधी - शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून कापूस विक्रीचे १० लाख ७५ हजार रुपये लुटून नेणाऱ्या टोळीचा शोध धुळे पोलिसांनी...
क्राईम 
धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..