रावसाहेब रूपचंद विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा; २६/११ हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली!

Maharashtra Sarthi Team Picture
On

fbfdf0eb-4a52-4fe7-aad3-d30488262439

जळगाव (प्रतिनिधी) : रावसाहेब रूपचंद विद्यालयात गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये, मूलभूत हक्क आणि नागरिकांच्या कर्तव्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गिरीश. आर. भावसार होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संविधान पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपशिक्षक के. जे. सोनवणे यांनी संविधान दिनाचे महत्त्व, संविधान निर्मितीचा इतिहास, मूलभूत तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संविधानाची प्रार्थना व शपथ देण्यात आली. तसेच संविधानातील मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन करण्यात आले.
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त एनसीसी विभाग प्रमुख गिरीश महाजन यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याची माहिती देत त्यांच्या बलिदानाला उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सामूहिक संविधान वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयाशू पोळ सर यांनी केले
याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक गिरीश. आर. भावसार, शिक्षक एस. आर. पिले, वाय. जी. चौधरी, डी.टी.पाटील, जयांशू पोळ, आर.बी.महाजन. दिवाकर साबळे, दिलीप पाटील, डी.डी.जोशी, बी. क्षीरसागर, पी. आर. श्रावगी, एम. एन. खडसे, सी. एन. पाटील, एल. पी. तायडे मॅडम, एनसीसी विभाग प्रमुख गिरीश महाजन, सा.का.समिती प्रमुख एम.एन.खडसे, एम.पी.बर्हाटे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

खबरें और भी हैं

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

ताजा बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

बुलढाणा (प्रतिनिधी)  राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले असले, तरी शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात शेतकऱ्याला...
राज्य 
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

नवी दिल्‍ली प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने आज उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल मार्ग प्रकल्पातील 6.59 किलोमीटर लांबीच्या ‘बोगदा क्रमांक 14’चे...
राष्ट्रीय 
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

धुळे प्रतिनिधी - शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून कापूस विक्रीचे १० लाख ७५ हजार रुपये लुटून नेणाऱ्या टोळीचा शोध धुळे पोलिसांनी...
क्राईम 
धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

दूरसंवाद सेवा आणि सायबर सुरक्षा याविषयी दूरसंवाद विभागाची मुंबई आणि महाराष्ट्रातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा..

मुंबई प्रतिनिधी - संपर्क मंत्रालयाच्या दूरसंवाद विभागाने, आपल्या मुंबई परवाना सेवा क्षेत्राच्या (मुंबई एलएसए) माध्यमातून देशव्यापी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा स्पर्धेची घोषणा...
राज्य 
दूरसंवाद सेवा आणि सायबर सुरक्षा याविषयी दूरसंवाद विभागाची मुंबई आणि महाराष्ट्रातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा..