श्रद्धेचा अनोखा संकल्प! नळदुर्ग ते अजमेर चार हजार किलोमीटरची सायकलवारी

Maharashtra Sarthi Team Picture
On

2caac693-184e-4954-a155-c65e748a64d5

नळदुर्ग (प्रतिनिधी) : श्रद्धा, जिद्द आणि साहसाचा अनोखा संगम घडवत नळदुर्ग येथील सय्यद निजाम खुर्बान इनामदार हे चार हजार किलोमीटरहून अधिक अंतराच्या सायकल प्रवासासाठी बुधवारी रवाना झाले. महिनाभर चालणाऱ्या या धार्मिक सायकल यात्रेद्वारे ते राजस्थानमधील अजमेरसह देशातील विविध प्रसिद्ध दर्ग्यांना भेट देणार आहेत. या प्रवासात ते राजस्थानमधील अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्गा, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा, कलीयर, पानिपत यांसह अन्य धार्मिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेणार आहेत. तब्बल चार हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर सायकलवरून पार करण्याचा त्यांनी निर्धार केला असून, त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची नळदुर्ग परिसरात चर्चा होत आहे.

बुधवारी नळदुर्ग येथून प्रस्थान करताना काँग्रेसचे नसीर इनामदार यांच्यासह नागरिकांनी निजाम इनामदार यांचा सत्कार करून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सज्जाद इनामदार, तबरेज इनामदार, कमरान इनामदार, रेहान शेख, मूर्तजा नवाब यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

श्रद्धा आणि जिद्दीच्या बळावर हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी निघालेल्या निजाम इनामदार यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या धार्मिक यात्रेबद्दल नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

खबरें और भी हैं

श्रद्धेचा अनोखा संकल्प! नळदुर्ग ते अजमेर चार हजार किलोमीटरची सायकलवारी

ताजा बातम्या

श्रद्धेचा अनोखा संकल्प! नळदुर्ग ते अजमेर चार हजार किलोमीटरची सायकलवारी

नळदुर्ग (प्रतिनिधी) : श्रद्धा, जिद्द आणि साहसाचा अनोखा संगम घडवत नळदुर्ग येथील सय्यद निजाम खुर्बान इनामदार हे चार हजार किलोमीटरहून...
राज्य 
श्रद्धेचा अनोखा संकल्प! नळदुर्ग ते अजमेर चार हजार किलोमीटरची सायकलवारी

आलियाबाद पुलाखाली पुन्हा मगरीचे वावर; नदीपात्रात न उतरण्याचे तहसीलदारांचे आवाहन

नळदुर्ग (प्रतिनिधी): नळदुर्ग शहराजवळील आलियाबाद पुलाखाली बोरी नदीच्या पात्रात पुन्हा मगर दिसून आल्याने परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या...
राज्य 
आलियाबाद पुलाखाली पुन्हा मगरीचे वावर; नदीपात्रात न उतरण्याचे तहसीलदारांचे आवाहन

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते नागपूरमध्ये महिला सक्षमीकरणावरील 'स्वयंसिद्धा राष्ट्रीय परिषद 2026'चे उद्घाटन

नागपूर प्रतिनिधी - उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्रातील नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 'स्वयंसिद्धा केंद्रा'द्वारे आयोजित...
राष्ट्रीय  राज्य 
उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते नागपूरमध्ये महिला सक्षमीकरणावरील 'स्वयंसिद्धा राष्ट्रीय परिषद 2026'चे उद्घाटन

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव (प्रतिनिधी) :   स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान आणि योग्य उपचार झाल्यास या आजारावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते. याची संबंधित...
जळगाव 
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया