महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवेसाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

दोन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश

Maharashtra Sarthi Team Picture
On

63af9735-07a3-447d-9514-444843114842 (1)

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स व नवीन ॲम्ब्युलन्स सेवांचे संचालन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठी परिवहन विभागाने सात सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीने शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवांसाठी स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. या बैठकीतील निर्णयानुसार परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत एसओपी तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शासनाने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून या समितीची अधिकृत स्थापना केली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी परिवहन आयुक्त कार्यालयातील अपर परिवहन आयुक्त रवी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मोक्षदा पाटील, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयातील पोलीस अधीक्षक सुनील भारद्वाज, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग, उपसंचालक जयंत मुळे आणि परिवहन आयुक्त कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षाचे पोलीस उपअधीक्षक प्रमोद तावडे यांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षाचे परिवहन उपायुक्त सचिनकुमार गिरी हे समितीचे सदस्य-सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स तसेच नवीन ॲम्ब्युलन्स सेवांबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. समितीने विविध बाबींचा अभ्यास करून शासनाला आवश्यक त्या शिफारशींसह अहवाल सादर करायचा आहे. शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत हा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवांच्या नियोजनबद्ध संचालनासाठी एकसमान प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

खबरें और भी हैं

५ किमी पांदण रस्ता स्वखर्चाने मोकळा; सोयगाव पंचायत समितीचे ठराव प्रलंबित असल्याने घोसला ग्रामस्थांचा स्वावलंबी बाणा

ताजा बातम्या

५ किमी पांदण रस्ता स्वखर्चाने मोकळा; सोयगाव पंचायत समितीचे ठराव प्रलंबित असल्याने घोसला ग्रामस्थांचा स्वावलंबी बाणा

सोयगाव (प्रतिनिधी) : सोयगाव पंचायत समितीकडे मातोश्री पांदण रस्ता आणि बळीराजा पांदण रस्ता योजनांसाठी दोन वेळा ठराव सादर करूनही अद्याप...
राज्य 
५ किमी पांदण रस्ता स्वखर्चाने मोकळा; सोयगाव पंचायत समितीचे ठराव प्रलंबित असल्याने घोसला ग्रामस्थांचा स्वावलंबी बाणा

माळावरील आई जगदंबा मातेची यात्रा उत्साहात ; हजारो भाविकांची उपस्थिती

शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकोळपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या माळावरील आई जगदंबा मातेच्या मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा...
राज्य 
माळावरील आई जगदंबा मातेची यात्रा उत्साहात ; हजारो भाविकांची उपस्थिती

निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातून ज्ञानासोबतच मैत्रीचेही अनमोल धडे

नागपूर (प्रतिनिधी) : आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, गणेश नगर, नागपूर येथे शिक्षकांसाठी आयोजित दहा दिवसीय निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचा नुकताच उत्साहपूर्ण...
राज्य 
निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातून ज्ञानासोबतच मैत्रीचेही अनमोल धडे

यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राच्या जडणघडणीचे शिल्पकार

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वांचे योगदान इतके महत्त्वपूर्ण आहे की, त्यांच्या कार्याचा विचार केल्याशिवाय आधुनिक...
लेख  
यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राच्या जडणघडणीचे शिल्पकार