माळावरील आई जगदंबा मातेची यात्रा उत्साहात ; हजारो भाविकांची उपस्थिती

Maharashtra Sarthi Team Picture
On

IMG-20261125-WA0031

शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकोळपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या माळावरील आई जगदंबा मातेच्या मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा कमिटी कडून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून जगदंबा मातेचे दर्शन घेतले.

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात प्रसादाचे स्टॉल, थंडाईची दुकाने, लहान मुलांसाठी खेळण्यांची दुकाने, रहाटपाळणे तसेच विविध वस्तूंचे स्टॉल थाटण्यात आले होते. त्यामुळे परिसरात यात्रेची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. लहान मुलांसह महिला व नागरिकांनीही यात्रेचा आनंद घेतला.

दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. कार्तिक पौर्णिमेनिमित्त भरलेल्या या यात्रेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या यात्रेस शिरूर अनंतपाळ, साकोळ, कानेगाव, शेंद, तिपराळ, होनमाळ, तळेगाव (दे.), अजनी (बु.), बाकली, अंकुलगा सय्यद, बिबराळ, उजेड आदी गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साकोळपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आई जगदंबा मातेच्या देवस्थानाला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, साकोळ पासून देवस्थानाकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन रस्त्याचे काम करावे .तसेच पर्यटन स्थळ दर्जा मिळण्याची मागणी यात्रा कमिटी कडून करण्यात आली आहे

खबरें और भी हैं

शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाच्या अनुदानाचा घोळ! मंजूर यादीत नावे, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा नाही; ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने शेतकरी त्रस्त!

ताजा बातम्या

शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाच्या अनुदानाचा घोळ! मंजूर यादीत नावे, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा नाही; ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने शेतकरी त्रस्त!

शिंदखेडा (प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे आणि कदाने येथील शेतकऱ्यांचे सन २०२४-२५ मध्ये मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर...
राज्य 
शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाच्या अनुदानाचा घोळ! मंजूर यादीत नावे, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा नाही; ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने शेतकरी त्रस्त!

शेतकरी, शेतमजुरांना तातडीचा दिलासा द्या; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

   धाराशिव (प्रतिनिधी) : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यासह धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे....
राज्य 
शेतकरी, शेतमजुरांना तातडीचा दिलासा द्या; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव (प्रतिनिधी) :   स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान आणि योग्य उपचार झाल्यास या आजारावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते. याची आधुनिक...
जळगाव 
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

जात वैधतेचे अर्ज, सुनावणी अन् प्रमाणपत्र वितरण ऑनलाइन

मुंबई (प्रतिनिधी) : जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा...
मुंबई 
जात वैधतेचे अर्ज, सुनावणी अन् प्रमाणपत्र वितरण ऑनलाइन