- Hindi News
- राज्य
- शेतकरी, शेतमजुरांना तातडीचा दिलासा द्या; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शेतकरी, शेतमजुरांना तातडीचा दिलासा द्या; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
.jpg)
धाराशिव (प्रतिनिधी) : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यासह धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही उत्पन्न आलेले नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी सर्वस्तरीय उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, भविष्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत. दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. तसेच दुष्काळी अनुदानाचे वितरण तातडीने करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.पशुपालक शेतकऱ्यांना आगामी काळात चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी चारा छावण्या आणि चारा डेपो त्वरित सुरू करावेत. शेतकऱ्यांनी बँका, फायनान्स कंपन्या, मायक्रो फायनान्स संस्था तसेच सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीला स्थगिती द्यावी. पीक उत्पन्न हाती आल्यानंतर कर्जफेडीची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्जमाफी योजना तातडीने लागू करावी. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर शेतमजूर, कामगार, महिला शेतमजूर आणि एकल महिला कुटुंबांनाही बसत आहे. त्यामुळे या घटकांना आर्थिक संरक्षण देऊन तातडीने अनुदान वितरित करावे. रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करून मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना एसटी बसचा प्रवास पूर्णतः मोफत करून शैक्षणिक शुल्क माफ करावे.पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने टँकरची व्यवस्था करावी. सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. गावागावातील स्वयंसेवी संस्थांना जलसंधारणाची कामे द्यावीत. ग्रामस्तरावर विविध घटकांचा समावेश असलेल्या शासकीय समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशी मागणीही मनसेने केली आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुका सचिव धनाजी साठे, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, शहर उपाध्यक्ष अविनाश पवार, समीर शेख आणि सोमेश्वर आलुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Edited By: Maharashtra Sarthi Team
खबरें और भी हैं
शेतकरी, शेतमजुरांना तातडीचा दिलासा द्या; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By
Maharashtra Sarthi Team
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
By
Maharashtra Sarthi Team
जात वैधतेचे अर्ज, सुनावणी अन् प्रमाणपत्र वितरण ऑनलाइन
By
Maharashtra Sarthi Team
पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर शस्त्रांचा थरार; गोळीबारानंतर कोयत्याने हल्ला, एकजण गंभीर जखमी
By
Maharashtra Sarthi Team
माळावरील आई जगदंबा मातेची यात्रा उत्साहात ; हजारो भाविकांची उपस्थिती
By
Maharashtra Sarthi Team
निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातून ज्ञानासोबतच मैत्रीचेही अनमोल धडे
By
Maharashtra Sarthi Team
यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राच्या जडणघडणीचे शिल्पकार
By
Maharashtra Sarthi Team
खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By
Maharashtra Sarthi Team
जरांगे पाटील ७ डिसेंबरपासून राज्याच्या दौरा सुरू करणार
By
Maharashtra Sarthi Team
गुरू नानक : समता, सेवा आणि मानवतेचा प्रकाश
By
Maharashtra Sarthi Team
मुंबईसाठी 'पाताळ लोक': ३१ किमी भुयारी मार्ग, ७० हजार कोटींचा महाप्रकल्प
By
Maharashtra Sarthi Team
केबीसीच्या मंचावर जळगावचा डंका; भूषण ठाकरे ठरला अठराव्या पर्वाचा पहिला करोडपती!
By
Maharashtra Sarthi Team
ताजा बातम्या
शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाच्या अनुदानाचा घोळ! मंजूर यादीत नावे, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा नाही; ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने शेतकरी त्रस्त!
Published On
By
Maharashtra Sarthi Team
शिंदखेडा (प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे आणि कदाने येथील शेतकऱ्यांचे सन २०२४-२५ मध्ये मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर...
शेतकरी, शेतमजुरांना तातडीचा दिलासा द्या; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Published On
By
Maharashtra Sarthi Team
धाराशिव (प्रतिनिधी) : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यासह धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे....
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
Published On
By
Maharashtra Sarthi Team
जळगाव (प्रतिनिधी) : स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान आणि योग्य उपचार झाल्यास या आजारावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते. याची
आधुनिक...
जात वैधतेचे अर्ज, सुनावणी अन् प्रमाणपत्र वितरण ऑनलाइन
Published On
By
Maharashtra Sarthi Team
मुंबई (प्रतिनिधी) : जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा...
