महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

मॉडिफाइड रॅडिकल मॅस्टेक्टोमी पद्धतीने दीड तासात शस्त्रक्रिया; महिलेच्या प्रकृतीत सुधारणा

Maharashtra Sarthi Team Picture
On

a613f027-e23c-452f-ac64-eed90dd114b9

जळगाव (प्रतिनिधी) :  स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान आणि योग्य उपचार झाल्यास या आजारावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते. याची प्रचिती महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आली. छातीत गाठ आढळून आलेल्या ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. तुषा चौधरी आणि डॉ. रोहित बुक्का यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

संबंधित ६० वर्षीय महिलेला छातीमध्ये गाठ जाणवत होती. सुरुवातीला या गाठीकडे दुर्लक्ष न करता तिने वैद्यकीय सल्ला घेतला. महादेव रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरांनी तिची प्राथमिक तपासणी केली. आजाराचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी एक्स-रे, सीटी स्कॅन तसेच सुईच्या साहाय्याने गाठीची तपासणी (बायोप्सी) करण्यात आली. या सर्व तपासण्यांच्या अहवालांचे निरीक्षण केल्यानंतर महिलेला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.आजाराचे स्वरूप आणि रुग्णाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

आधुनिक पध्दतीने शस्त्रक्रिया
 त्यानुसार मॉडिफाइड रॅडिकल मॅस्टेक्टोमी या शस्त्रक्रिया पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या शस्त्रक्रियेमध्ये कर्करोगग्रस्त स्तनाच्या ऊतींसह आवश्यकतेनुसार काखेतील लसिकाग्रंथींवरही उपचार केले जातात. डॉ. तुषार चौधरी आणि डॉ. रोहित बुक्का यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली.सुमारे दीड तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती सुधारू लागली. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर पुढील उपचार आणि निरीक्षण सुरू आहे. स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर योग्य वेळी उपचार घेणे महत्त्वाचे असते. छातीत किंवा स्तनात गाठ जाणवणे, स्तनाच्या आकारात बदल होणे, त्वचेवर बदल दिसणे किंवा स्तनाग्रातून असामान्य स्त्राव होणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.महादेव रुग्णालयात विविध आजारांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार आणि शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे जळगावसह परिसरातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होत आहे.

महादेव रुग्णालयात सहा रुग्णांवर हर्नियाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियामहादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सहा रुग्णांवर हर्नियाची दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपिक) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणार्‍या या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना उपचारांची सुविधा उपलब्ध होत आहे. याशिवाय रुग्णालयात दुर्बिणीद्वारे पित्ताशयातील खडे (गॉलस्टोन) आणि अपेंडिक्सच्या आजारावरील शस्त्रक्रिया मोफत करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

खबरें और भी हैं

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

ताजा बातम्या

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव (प्रतिनिधी) :   स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान आणि योग्य उपचार झाल्यास या आजारावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते. याची संबंधित...
जळगाव 
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाच्या अनुदानाचा घोळ! मंजूर यादीत नावे, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा नाही; ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने शेतकरी त्रस्त!

शिंदखेडा (प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे आणि कदाने येथील शेतकऱ्यांचे सन २०२४-२५ मध्ये मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर...
राज्य 
शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाच्या अनुदानाचा घोळ! मंजूर यादीत नावे, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा नाही; ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने शेतकरी त्रस्त!

शेतकरी, शेतमजुरांना तातडीचा दिलासा द्या; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

   धाराशिव (प्रतिनिधी) : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यासह धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे....
राज्य 
शेतकरी, शेतमजुरांना तातडीचा दिलासा द्या; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जात वैधतेचे अर्ज, सुनावणी अन् प्रमाणपत्र वितरण ऑनलाइन

मुंबई (प्रतिनिधी) : जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा...
मुंबई 
जात वैधतेचे अर्ज, सुनावणी अन् प्रमाणपत्र वितरण ऑनलाइन