- Hindi News
- राज्य
- माजी मंत्री आमदार संजय बनसोडे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित
माजी मंत्री आमदार संजय बनसोडे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित

उदगीर (प्रतिनिधी) : माजी मंत्री तथा उदगीर- जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांना मुंबई येथील साईदिशा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ सिनेअभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री काजल अग्रवाल, IPS अधिकारी कृष्ण प्रकाश आणि सुनील फुलारे यांच्या हस्ते देण्यात आला. उदगीर मतदार संघाचा कायापालट करुन देशाच्या नकाशावर उदगीरचे नाव कोरले. सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राला दिलेले पाठबळ. सार्वजनिक जीवनातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, शासनाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळताना जनकल्याणासाठी दिलेले योगदान तसेच समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. सदर पुरस्कार आमदार संजय बनसोडे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या उदगीर-जळकोटच्या जनतेला समर्पित केला आहे. यावेळी बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत, त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अधिक जोमाने आणि वेगाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नसून जनसेवेची जबाबदारी अधिक निष्ठेने पार पाडण्याची प्रेरणा असल्याचे सांगितले. साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण माने यांच्या माध्यमातून सन २००० पासून सामाजिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. काल शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
