- Hindi News
- जळगाव
- खंडाळे विकास मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप
खंडाळे विकास मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप

जळगाव (प्रतिनिधी) : खंडाळे विकास मंडळ, खंडाळे, जुना खेडी रोड, सदाशिवनगर, जळगाव संचलित चॅरिटेबल ट्रस्ट (शासनमान्य नोंदणी क्रमांक एफ-२०९११) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आवार, ता. जि. जळगाव येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी शालेय गणवेश (ड्रेस) व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या सामाजिक भावनेतून संस्थेने हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.
खंडाळे विकास मंडळाच्या माध्यमातून यापूर्वीही विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले असून, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य संस्था सातत्याने करीत आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या चेअरमन सौ. सविता विलास कोळी, सचिव श्री. शुभम विलास कोळी, व्हाईस चेअरमन श्रीमती अनिता अजय शर्मा, तसेच संस्थेचे संचालक सौ. सायली शुभम झोडगे, श्री. रवींद्र दोधू पवार, श्री. निलेश गणपत चौधरी, श्री. सौरभ रवींद्र पवार, श्री. प्रणव तळले व श्रीमती मीरा ताई सोनवणे उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भिकाभाऊ सपकाळे व शिक्षिका सौ. प्रतीक्षा चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा ठरला.
