देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही

महावितरण अधिकारी पाटील यांचा देवळाली कॅम्प शाखा अभियंता पाचंगे यांना कडक सूचना

Maharashtra Sarthi Team Picture
On

5f5f3525-c541-443e-8c4d-ebab23a141dd

देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. ज्या दिवशी पाणी येतो, त्या दिवशी लाईट जाऊ नये, यासाठी कॅन्टोन्मेंटशी समन्वय साधूनच लाईट घालवावा, अशा कडक सूचना महावितरण चे वरीष्ठ अधिकारी पाटील यांनी देवळाली शाखा अभियंता पाचंगे यांना दिल्या आहेत.
पाणीपुरवठ्याच्या दिवशी विज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याला पूर्णपणे जबाबदार महावितरण, देवळाली कॅम्प शाखा राहील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तेजस बुंदेले यांनी दिला आहे.
पाणी आले आणि लाईट गेली तर नागरिकांना पाणी भरता येत नाही, मोटार चालवता येत नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊनच प्रशासनाने समन्वय साधावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जर पुन्हा पाण्याच्या दिवशी लाईट गेली तर हंडा मोर्चा काढून विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देण्यात येईल, असा इशारा देखील तेजस बुंदेले यांनी दिला आहे.या इशाऱ्यामुळे महावितरण प्रशासन आता काय पावले उचलते, याकडे देवळालीकरांचे लक्ष लागले आहे.

पिण्याच्या पाण्याचा दिवशी लाईट खंडित झाली तर महावितरण देवळाली कॅम्प शाखेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल.5a8a16dc-3924-46a5-8f40-23a92c316bc7

- तेजस बुंदेले, सामाजिक कार्यकर्ते देवळाली कॅम्प

खबरें और भी हैं

देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही

ताजा बातम्या

देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही

देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. ज्या दिवशी पाणी येतो, त्या दिवशी लाईट जाऊ...
नाशिक  
देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही

खंडाळे विकास मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप

जळगाव (प्रतिनिधी) : खंडाळे विकास मंडळ, खंडाळे, जुना खेडी रोड, सदाशिवनगर, जळगाव संचलित चॅरिटेबल ट्रस्ट (शासनमान्य नोंदणी क्रमांक एफ-२०९११) यांच्या...
जळगाव 
खंडाळे विकास मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप

माजी मंत्री आमदार संजय बनसोडे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित

उदगीर (प्रतिनिधी) : माजी मंत्री तथा उदगीर- जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांना मुंबई येथील साईदिशा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा...
राज्य 
माजी मंत्री आमदार संजय बनसोडे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित

एरंडोलजवळ राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

एरंडोल (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात शास्त्री फार्मसी महाविद्यालयातील द्वितीय...
जळगाव 
एरंडोलजवळ राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक