देवळाली कॅम्प पोलीसांची धडक कारवाई

५२ टवाळखोर व मद्यपींवर गुन्हे, ३२ जणांवर स्टॉप अँड सर्च

Maharashtra Sarthi Team Picture
On

theleaflet_import_wp-content_uploads_2021_09_Screenshot-2021-09-16-at-12.36.14-PM

देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : वरिष्ठांच्या आदेशान्वये आज दिनांक २७/११/२०२६ रोजी संध्याकाळी १८: ०० ते २१: ०० वाजेदरम्यान देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये टवाळखोर व मद्यपी इसमांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण ५२ टवाळखोर व मद्यपी इसमांवर महाराष्ट्र अधिनियम कलम ११२/११७ नुसार कारवाई करण्यात आली. तसेच नाकाबंदी दरम्यान संशयित वाहने तपासून ३२ इसमांवर स्टॉप अँड सर्च कारवाई करण्यात आली आहे.
टवाळखोरांवर कारवाई केलेली ठिकाणे:
१) झेंडा चौक
२) संडे बाजार
३) जुने बसस्टॉप
४) बँक ऑफ महाराष्ट्र
५) संसारी घाट
६) भगूर बस स्टॉप
नाकाबंदीची ठिकाणे:
१) भगूर नाका नं. २
२) झेंडा चौक
सदर कारवाई देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी एकूण १० अधिकारी व ३१ अंमलदार हजर होते.
कारवाईत सहभागी पोलीस पथक:
१) देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन- ०६ अधिकारी, १६ अंमलदार
२) अंबड पोलीस स्टेशन- ०१ अधिकारी, ०४ अंमलदार
३) इंदिरानगर पोलीस स्टेशन- ०१ अधिकारी, ०१ अंमलदार
४) MIDC पोलीस स्टेशन- ०४ अंमलदार
५) उपनगर पोलीस स्टेशन- ०३ अंमलदार
६) नाशिक रोड पोलीस स्टेशन- ०१ अधिकारी, ०२ अंमलदार
७) सातपूर पोलीस स्टेशन- ०१ अधिकारी, ०१ अंमलदार
पुढील काळातही अशा प्रकारच्या टवाळखोर व मद्यपींविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खबरें और भी हैं

देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही

ताजा बातम्या

देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही

देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. ज्या दिवशी पाणी येतो, त्या दिवशी लाईट जाऊ...
नाशिक  
देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही

खंडाळे विकास मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप

जळगाव (प्रतिनिधी) : खंडाळे विकास मंडळ, खंडाळे, जुना खेडी रोड, सदाशिवनगर, जळगाव संचलित चॅरिटेबल ट्रस्ट (शासनमान्य नोंदणी क्रमांक एफ-२०९११) यांच्या...
जळगाव 
खंडाळे विकास मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप

माजी मंत्री आमदार संजय बनसोडे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित

उदगीर (प्रतिनिधी) : माजी मंत्री तथा उदगीर- जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांना मुंबई येथील साईदिशा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा...
राज्य 
माजी मंत्री आमदार संजय बनसोडे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित

एरंडोलजवळ राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

एरंडोल (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात शास्त्री फार्मसी महाविद्यालयातील द्वितीय...
जळगाव 
एरंडोलजवळ राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक