- Hindi News
- जळगाव
- जळगाव जिल्ह्याच्या पुरुष व महिला खो-खो संघांची निवड जाहीर!
जळगाव जिल्ह्याच्या पुरुष व महिला खो-खो संघांची निवड जाहीर!
६२व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी अहिल्यानगर येथे करणार जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व; दोन्ही संघांत प्रत्येकी १५ खेळाडूंचा समावेश

भडगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने सन २०२६-२७ या क्रीडा वर्षातील पुरुष व महिला गटाच्या ६२ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघांची निवड जाहीर करण्यात आली आहे.जिल्हा संघाच्या निवडीसाठी निवड समितीने खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करून पुरुष व महिला गटातील प्रत्येकी १५ खेळाडूंची निवड केली आहे.
पुरुष संघ
मोहीत गुंजकर (कर्णधार), चैतन्य पोळ, हिमांशू पाटील, दर्शन भावसार, रोहित कोळी, आर्यन पावरा, बादल पावरा, नमनसिंग पाटील, आकाश बारेला, प्रतीक सपकाळे, प्रथमेश कंखरे, अजय पावरा, योगेश साळुंके, मंगीलाल पावरा व पवन पावरा.
प्रशिक्षक: विशाल पाटील
व्यवस्थापक: गोपाळ पवार
महिला संघ
हेतल पाटील (कर्णधार), सोनाली घेंगट, पूर्वी सोनवणे, पायल पावरा, विभा सोनवणे, माधुरी गायकवाड, नेहा ढेरे, कोमल नेहते, पूर्वा पाटील, गौरी जाधव, नेहा धांडे, अंतरा सराफ, रोशनी वळवी, मयुरी गायकवाड व आरती वळवी.
प्रशिक्षक: राहुल पोळ
व्यवस्थापक: स्नेहल गायकवाड
पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य
जळगाव जिल्ह्यात खो-खो खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव जयांशु पोळ, जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ, तसेच संघटनेचे पदाधिकारी विद्या कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध उपक्रम व निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
याशिवाय आमदार चंद्रकांत सोनवणे, प्रा. डी. डी. बच्छाव, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ, उदय पाटील, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर आणि सुनील समदाणे यांचेही जिल्ह्यातील खो-खो खेळाच्या विकासासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देणारे संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि क्रीडाप्रेमी यांच्या सहकार्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या खो-खो क्षेत्राला नवी उभारी मिळत असून, राज्यस्तरीय स्पर्धेत दोन्ही संघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
