हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

Maharashtra Sarthi Team Picture
On

1de04167-36cc-46b5-9890-8e28a28c7d75

जळगाव (प्रतिनिधी) : वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या महान विचारांना व कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये तसेच लोकशाही मूल्यांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी. जी.शेळके सर, उपमुख्याध्यापक श्री. जी. आर. आरकीलवाड सर, पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही. जाधव मॅडम, पर्यवेक्षक श्री. के. बी. वायचाळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या संयोजिका श्रीमती एस. आर. पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानातील मूलभूत मूल्यांविषयी आपले विचार मांडले.या स्पर्धेसाठी इतिहास विषयाचे अध्यापक श्री. बालाजी अन्नपूर्वे सर यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.पी.जी शेळके सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववी के च्या विद्यार्थिनी कु. प्राप्ती लोखंडे व अष्टमी कदम यांनी केले.या कार्यक्रमास सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संविधानाविषयी आदर, राष्ट्रनिष्ठा आणि लोकशाही मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.भारतीय संविधानाचा सन्मान करूया, लोकशाही मूल्यांचे जतन करूया!

खबरें और भी हैं

हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

ताजा बातम्या

हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) : वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....
जळगाव 
हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

शिवाई बसचे दर लालपरीच्या बरोबरीने करा; अन्यथा मनसेचे आंदोलन

धाराशिव (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ई-शिवाई बसचे तिकीट दर साध्या...
राज्य 
शिवाई बसचे दर लालपरीच्या बरोबरीने करा; अन्यथा मनसेचे आंदोलन

ज्ञानाची देवाणघेवाण, अनुभवांची शिदोरी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास!

जळगाव (प्रतिनिधी) : महात्मा गांधी विद्यालय, भादली बु. येथे दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे ‘पुष्प चौथे’ उत्साहपूर्ण...
जळगाव 
ज्ञानाची देवाणघेवाण, अनुभवांची शिदोरी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास!

देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही

देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. ज्या दिवशी पाणी येतो, त्या दिवशी लाईट जाऊ...
नाशिक  
देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही