एरंडोलजवळ राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

बी. फार्मसीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, सीआरपीएफ जवान गंभीर जखमी.!

Maharashtra Sarthi Team Picture
On

95a0cfc5-6493-46b5-9a22-98a607a4487d

एरंडोल (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात शास्त्री फार्मसी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान गंभीर जखमी झाला असून, अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास समर्थ बैठक हॉलजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्री फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी जयेश अनिल पाटील (वय १९वर्षे, रा. तामसवाडी, ता. पारोळा), निखिल दिनेश पवार (रा. नानखुर्दे, ता. एरंडोल) आणि सुधाकर कुंभार (मूळ गाव समजू शकले नाही) हे तिघे परीक्षेचा पेपर संपल्यानंतर दुचाकीवरून (क्र. MH-१९-EH-६३७९) एरंडोलच्या दिशेने येत होते.
दुसरीकडे, सचिन नाना पाटील (वय २५, सीआरपीएफ जवान), कुणाल जिजाबराव पाटील (वय २१) आणि दिगंबर तुकाराम पाटील (वय २०, सर्व रा. तुराटखेडे) हे तिघे एरंडोल येथून खरेदी करून आपल्या मूळ गावी तुराटखेडेकडे दुचाकीवरून (क्र. MH-१९-CM-२९२२) परत जात होते. समर्थ बैठक हॉलजवळ महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की बी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा जयेश अनिल पाटील याचा जागीच मृत्यू झाला. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तो पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे मामाकडे राहून शिक्षण घेत होता आणि मामाच त्याचा सांभाळ करत होते. जयेशच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात व महाविद्यालयात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील सीआरपीएफ जवान सचिन नाना पाटील हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले आहे. याशिवाय निखिल पवार, सुधाकर कुंभार, दिगंबर पाटील आणि कुणाल पाटील हे चौघे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर एरंडोल ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

खबरें और भी हैं

हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

ताजा बातम्या

हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) : वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....
जळगाव 
हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

शिवाई बसचे दर लालपरीच्या बरोबरीने करा; अन्यथा मनसेचे आंदोलन

धाराशिव (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ई-शिवाई बसचे तिकीट दर साध्या...
राज्य 
शिवाई बसचे दर लालपरीच्या बरोबरीने करा; अन्यथा मनसेचे आंदोलन

ज्ञानाची देवाणघेवाण, अनुभवांची शिदोरी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास!

जळगाव (प्रतिनिधी) : महात्मा गांधी विद्यालय, भादली बु. येथे दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे ‘पुष्प चौथे’ उत्साहपूर्ण...
जळगाव 
ज्ञानाची देवाणघेवाण, अनुभवांची शिदोरी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास!

देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही

देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. ज्या दिवशी पाणी येतो, त्या दिवशी लाईट जाऊ...
नाशिक  
देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही