संसारी नाक्यापासून संसारी गावाकडे जाणारा मार्ग खडतर, दर्जेदार रस्त्याची मागणी

Maharashtra Sarthi Team Picture
On

401f4302-1a60-4773-99da-12a3817dbf78

संसारी नाक्यावर संसारी गावाकडे जाणारा खडतर मार्ग

देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : लॅम रोडचे काँक्रिटीकरण झाले असले तरी संसारी नाक्यापासून संसारी गावाकडे जाणारा मार्ग मात्र खडतर झाला आहे. मोठा उतार असल्याने नागरिकांची तारांबळ उडते. वाहनचालकांना आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
लॅम रोडचा मुख्य रस्ता चांगला झाला, मात्र त्याला जोडणाऱ्या चौफुली वळण रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी योग्य प्रकारे मुरूम टाकून रस्ता चांगल्या दर्जेचा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संसारी गावचे माजी उपसरपंच शेखर गोडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
संसारी गाव ते लॅम रोड दरम्यान शाळकरी मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना ये-जा करताना अडचणी येतात. शेतकरी बांधवांनाही शेतमाल वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागतो.
संसारी नाक्यापासून गावाकडे जाणाऱ्या मार्गाला मोठा उतार आहे. मुख्य रस्ता आणि जोडलेले रस्ते यांची व्यवस्थित जोडणी झालेली नाही. एकीकडे उतार तर दुसरीकडे चढण असा रस्ता असल्याने वाहन चालवणे अधिक धोकादायक झाले आहे, असे शेखर गोडसे यांनी सांगितले.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पाहणी करून चौफुली वळण रस्त्यांवर मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

“लॅम रोड चांगला झाला, पण त्याला जोडलेले चौफुलीचे रस्ते तसेच खडतर राहिले. मुख्य रस्ता आणि जोडरस्ते समान पातळीवर असतील तरच वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. वाहनधारकांना सोयीस्कर होईल आणि अपघातही टळतील. म्हणून चौफुलीवरील रस्ते तात्काळ समान करून दुरुस्त करावेत, हीच आमची मागणी आहे.” 
  - शेखर गोडसे, माजी उपसरपंच, संसारी4ef37811-58d8-44e5-bc39-cdf74b27a412

खबरें और भी हैं

खोरी-जामदे परिसरात हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा उघड!

ताजा बातम्या

खोरी-जामदे परिसरात हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा उघड!

टिटाणे (प्रतिनिधी)  : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खोरी आणि जामदे परिसरात प्राचीन स्थापत्यकलेचा अनमोल वारसा समोर आला आहे. न्हाय नदीच्या...
राज्य 
खोरी-जामदे परिसरात हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा उघड!

महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या नाशिक जिल्हा उच्च माध्यमिक विभागाच्या अध्यक्षपदी सोपान कांगने यांची अविरोध निवड

   देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : डॉ. गुजर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, देवळाली कॅम्प येथील शिक्षक श्री. सोपान आनंदा कांगणे यांची महाराष्ट्र...
नाशिक  
महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या नाशिक जिल्हा उच्च  माध्यमिक विभागाच्या अध्यक्षपदी सोपान कांगने यांची अविरोध निवड

दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजन काटेकोरपणे करा – मंत्री दादाजी भुसे

   मुंबई (प्रतिनिधी) : फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे करावे. परीक्षा...
मुंबई 
दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजन काटेकोरपणे करा – मंत्री दादाजी भुसे

एरंडोल तालुक्याला रब्बीसाठी मोठा दिलासा

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती अधिकच तीव्र होत असताना, रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे....
जळगाव 
एरंडोल तालुक्याला रब्बीसाठी मोठा दिलासा