एरंडोल तालुक्याला रब्बीसाठी मोठा दिलासा

१५ दिवसांनंतर अंजनी धरण व काळा बंधारातून सिंचन आवर्तन, पाणीचोरीवर फौजदारी कारवाईचा इशारा.!

Maharashtra Sarthi Team Picture
On

6acf7977-60f9-4531-878d-3b7d1896b6db

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती अधिकच तीव्र होत असताना, रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या १५ दिवसांनंतर अंजनी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांसह काळा बंधारा प्रणालीद्वारे शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच, हे सिंचन आवर्तन १५ दिवस चालणार असल्याची माहिती एरंडोल गिरणा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी कुलदीप पाटील यांनी दिली आहे.सध्या एरंडोल तालुक्यात काही भागांत रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली आहे. मात्र, वाढत्या दुष्काळी छायेमुळे पिकांना पाण्याची गरज भासत आहे. अशा वेळी अंजनी धरण व काळा बंधारा प्रणालीतून सोडले जाणारे हे सिंचन आवर्तन रब्बी पिकांसाठी अत्यंत उपयुक्त व पोषक ठरणार आहे. पाटबंधारे विभागाकडील माहितीनुसार, अंजनी धरणात सध्या ७७.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून एकूण पाणीसाठा १५.८७२ दलघमी व उपयुक्त पाणीसाठा १२.१०० दलघमी आहे.

सध्याची दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन अंजनी धरणातील जलसाठ्यातून एरंडोल व धरणगाव तालुक्यातील मोठ्या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचे काटेकोर नियोजन राहावे, यासाठी पाटबंधारे यंत्रणेकडून जलाशयातील पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थिती पाहता कोणत्याही नागरिकाने अथवा शेतकऱ्याने पाणीचोरी करू नये.कोठेही पाणीचोरी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रशासनाने सुचीत केले आहे.

खबरें और भी हैं

एरंडोल तालुक्याला रब्बीसाठी मोठा दिलासा

ताजा बातम्या

एरंडोल तालुक्याला रब्बीसाठी मोठा दिलासा

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती अधिकच तीव्र होत असताना, रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे....
जळगाव 
एरंडोल तालुक्याला रब्बीसाठी मोठा दिलासा

संसारी नाक्यापासून संसारी गावाकडे जाणारा मार्ग खडतर, दर्जेदार रस्त्याची मागणी

संसारी नाक्यावर संसारी गावाकडे जाणारा खडतर मार्ग देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : लॅम रोडचे काँक्रिटीकरण झाले असले तरी संसारी नाक्यापासून संसारी...
नाशिक  
संसारी नाक्यापासून संसारी गावाकडे जाणारा मार्ग खडतर, दर्जेदार रस्त्याची मागणी

श्रद्धेचा अनोखा संकल्प! नळदुर्ग ते अजमेर चार हजार किलोमीटरची सायकलवारी

नळदुर्ग (प्रतिनिधी) : श्रद्धा, जिद्द आणि साहसाचा अनोखा संगम घडवत नळदुर्ग येथील सय्यद निजाम खुर्बान इनामदार हे चार हजार किलोमीटरहून...
राज्य 
श्रद्धेचा अनोखा संकल्प! नळदुर्ग ते अजमेर चार हजार किलोमीटरची सायकलवारी

आलियाबाद पुलाखाली पुन्हा मगरीचे वावर; नदीपात्रात न उतरण्याचे तहसीलदारांचे आवाहन

नळदुर्ग (प्रतिनिधी): नळदुर्ग शहराजवळील आलियाबाद पुलाखाली बोरी नदीच्या पात्रात पुन्हा मगर दिसून आल्याने परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या...
राज्य 
आलियाबाद पुलाखाली पुन्हा मगरीचे वावर; नदीपात्रात न उतरण्याचे तहसीलदारांचे आवाहन